खडकीतील सर्वात जुनी असलेली पाण्याची टाकी जमिनोदस्त

पिंपरी : खडकीतील नागरिकांच्या सोयीसाठी १९७६ साली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ही बांधण्यात आलेली खडकी बाजारातील शेवाळे टॉवरजवळची जुनी पाण्याची टाकी सोमवारी, (दि.१३) रोजी तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर पूर्णपणे पाडण्यात आली.

आजूबाजूला घरे असल्याने ही टाकी पाडण्यासाठी खूप अडथळा येत होता. त्यामुळे सुरवातीला जेसीबीच्या सहाय्याने या टाकीचे तीन ते चार कॉलम काढण्यात होते. त्यामुळे टाकी अधिक धोकादायक बनली होती. कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी ही टाकी जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
काही काही वर्षानंतर टाकीतून पाणी झिरपू लागले, त्यावर बोर्डाने अनेकवेळा उपाय करून टाकी गळण्याचे थांबवले होते. मात्र, टाकीचे अनेक ठिकाणी पोपडे निघू लागल्याने बोर्डाने टाकी अर्धवट भरण्याचे सुरू केले व खडकीत पाणीटंचाई भासू लागली. १९९६ साली ही टाकी पूर्णपणे पाणी भरण्यास बंद करण्यात आली आणि नेहरू उद्यान येथील २५ लक्ष लिटरच्या नवीन बनवण्यात आलेल्या टाकीतून खडकीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १९९६ पासून ही टाकी बंद अवस्थेत होती. ती पाडण्यासाठी अनेक वेळा बोर्डाने निविदा मागवल्या होत्या. मात्र निविदांची रक्कम मोठी असल्यामुळे बोर्डाने अनेक वेळा निविदा फेटाळल्या होत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा