पुणे : पुणे येथील एस एल एडव्हेंचर या संस्थेच्या ७ गिर्यारोहकांनी (दि.७) रोजी तब्बल ४५० फूट उंच खडापारशी या अत्यंत कठीण अशा सुळक्यावर सात तासात यशस्वी चढाई केली.
मार्गदर्शक लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली आखली गेलेली ही मोहीम रॉक क्लाइम्बिंगच्या क्षेत्रातील एक अवघड मोहीम म्हणून ओळखली जाते. गिर्यारोहक सकाळी साडे नऊ वाजता वजीर वीर कृष्णा मरगळे यांनी लीड क्लाइम्बिंगला सुरुवात केली. या मोहिमेत एक ठरविण्यात आले होते की, सर्वच्या सर्व ७ गिर्यारोहक ७ तासात ७ तारखेला एकाचवेळी सुळक्याच्या शिखरावर पोहोचणार त्यामुळे ठरल्याप्रमाणे सगळे या अवघड सुळक्यावर चढाई करत होते.
ठरल्याप्रमाणे सगळे या अवघड सुळक्यावर चढाई करत होते. अगदी शेवटच्या टप्प्यावर शिखरापासून अंदाजे २० फूट चढाई बाकी होती. सर्व गिर्यारोहक अत्यंत कमी जागेत स्वतःला अँकर करून थांबले होते. ऊन मी म्हणत होते, पाणी संपत आले होते. दुपारच्या जेवणाचा प्रश्नच नव्हता, यश समोर दिसत होते. शिखरावर चढाई सुरू केली, चढण्यासाठी कृष्णाने कपारीत हात घातलाच होता की तिथे एक अत्यंत विषारी मण्यार जातीचा साप दडी मारून बसला होता. एक पट्टीचा ट्रेकर हा जात्याच सर्पमित्र असतो आणि या अनुभवाचा अंदाजे ४०० फूट उंचावर जिथे पळून जाण्यास एक इंच देखील जागा नव्हती तिथे उपयोग झाला. सर्वांनी मिळून त्या सापास बाजूला वाट करुन दिली आणि चढाई पुन्हा सुरू केली.
कृष्णा पाहिले शिखरावर पोहोचला. त्यानंतर मानसिंह आणि लहू जात असतांना अचानक ज्याला पकडले होते. तोच मोठा दगड निखळून खाली आला. लहूने क्षणही वाया न घालवता बिलेवर येऊन तो तसाच दाबून धरला आणि खाली उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना वाचवले. त्यानंतर भारती विद्यापीठाचे शिरीष कुलकर्णी, तुषार आणि रोहित अंतोडगी यांनी शिखरावर भगवा फडकवला.
शिखरावर डॉ प्रियांका रेड्डी यांना श्रद्धांजली तसेच डॉ पतंगराव कदम यांना आदरांजली वाहण्यात आली. आणि शिवगर्जना करून सर्वजण रॅपलिंग करून खाली.