‘खाकी : द बिहार चॅप्टर’ वेब सिरीजचे ‘रियल होरी’ अमित लोढा निलंबित

नवी दिल्ली, ९ डिसेंबर २०२२ :ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील ‘खाकी : द बिहार चॅप्टर’ ही वेब सिरीज ज्याच्यावर आधारित आहे, त्या आयपीएस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित लोढा असे त्यांचे नाव असून पाटणा येथे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

गयाचे आयजी अमित लोढा यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्याचे स्पेशल व्हिजिलन्स युनिटने (एसव्हीयू) स्पष्ट केले आहे. २०१७ मध्ये अमित लोढा यांनी लिहिलेले ‘बिहार डायरी’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकावरुन प्रेरणा घेत नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर यांनी मिळून ‘खाकी’ द बिहार चॅप्टर वेब सीरिज बनवली. ही वेब सीरिज २५ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. यात अमित लोढा हे एसपीच्या भूमिकेत होते.

अमित लोढा यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी असून आणि सरकारी नोकरीच्या पदावर असताना अमित लोढा यांनी नेटफ्लिक्सशी आर्थिक व्यवहार केला, फ्रायडे स्टोरी टेलर या प्रोडक्शन हाऊसशी डील केली. यातून त्यांना आर्थिक फायदा झाला. विभागांतर्गत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अमित लोढा यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्याचेही विभगाकडून सांगण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा