लाहोर, ६ मे २०२३: खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या परमजीत सिंग पंजवार यांची आज लाहोरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शहरातील सनफ्लॉवर सोसायटीत ही घटना घडली आहे. परमजीत यांने १९९० पासून पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचा उजवा हात मानला जात असे.
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यांतील पंजवाड गावातील मुळचा रहिवासी असणारा परमजीत पंजवार यांने ९० च्या दशकात पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. ५७ वर्षीय परमजीत यांच्यावर देशद्रोह, खून, कट रचणे शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवाद्यांना मदत आदी आरोप होते. माजी लष्करप्रमुख जनरल एएस वैध यांची हत्या आणि लुधियानामधील देशातील सर्वांत मोठ्या बँक चोरी प्रकरणातील आरोपी होता.
पाकिस्तानमध्ये पंजावर हा मलिक सरदार सिंग नावाने वावरत होता. आज सकाळी सहा वाजता लाहोर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीत मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आणि या हल्ल्यात परमजीत जागीच ठार झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर