खान्देशकन्या गायत्री ठाकूर यांची मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२३ साठी निवड

जळगाव ६ डिसेंबर २०२३ : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या हेरिटेज आणि संस्कृतीमुळे नेहमीच विशेष ठरतो. भारताची हीच अनोखी ओळख जपत जळगावची गायत्री ठाकूर हिने मिस हेरिटेज इंडिया २०२२ किताब गेल्यावर्षी पटकावला होता आणि यावर्षी थायलंड येथे होणाऱ्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२३ साठी देखिल भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान गायत्री ठाकूर हिला मिळाला आहे.

मूळची जळगावची गायत्री ठाकूर ही नृत्यांगना, मॉडेल, थिएटर आर्टिस्ट तसेच मुंबई विद्यापीठातून लोककला पदवीधर आणि जळगावच्या एम. जे. कॉलेज येथून लोकनृत्य पदवीधर आहे. तसेच बराचश्या ब्रँड्ससाठी गायत्रीने मॉडेलिंग केलेली आहे त्यासोबत गायु ठाकूर म्हणून रिल्सच्या माध्यमातून ती प्रसिद्ध आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ती लावणी या लोकनृत्याचं सादरीकरण आणि त्याचा जागर करत आलेली आहे.

ब्युटी विथ ब्रेन या थीमवर आधारित मिस हेरिटेज हा एक अनोखा ब्युटी पेजंट आहे. यात ब्युटी विथ ब्रेन सोबतच हेरिटेजला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हा अनोखा ब्युटी पेजंट दरवर्षी मृणाल गायकवाड यांच्या मृणाल एन्टरटेन्मेंटकडून आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय स्तरावरील हा शो पुणे येथे मागील वर्षी आयोजित केला गेला होता. त्यात जळगावच्या गायत्री ठाकूर हिने तिचा सहभाग नोंदविला होता. ऑडिशन, ग्रूमिंग अशा विविध स्पर्धात्मक फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून अखेर मिस हेरिटेज इंडिया २०२२ हा विनिंग टायटल आणि मिस फोटोजेनिक हेरीटेज २०२२ हे सबटायटल पटकावून गायत्री ठाकूर ही विजयी मानकरी ठरली.

मिस हेरिटेज इंडिया पेजेंटच्या विजयी उमेदवारांना पुढे इ प्लॅनेट यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिस हेरीटेज इंटरनॅशनलसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. यावर्षी १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या ९ दिवसाच्या थायलंड येथे होणाऱ्या मिस हेरीटेज इंटरनॅशनल २०२३ ची भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान जळगावच्या मिस हेरीटेज इंडिया २०२२ गायत्री ठाकूर हिला मिळालेला आहे. मागील वर्षी गायत्रीने हेरिटेज सादरीकरणासाठी अजिंठा थीमची निवड केलेली आहे. तिच्या या संपूर्ण प्रवासात अनेक लोकांनी तिला विशेष सहकार्य केलेले आहे, त्यात ॲड. राजेश झाल्टे यांच्याकडून आर्थिक स्वरूपात मदत तसेच नॅशनल कॉस्च्युम प्रोपसाठी एम आर्ट स्टुडिओ – मुनेश ढाके आणि निखिल सरोदे यांचे सहकार्य लाभलेले आहे.

मुख्य फायनलचा एवेनिंग गाऊन हा पुण्यातल्या रविना शहा, शुभ स्टुडिओ यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आला आहे. तिचे इतर कॉस्च्युम जळगावच्या डिजायनर जागृती हसवानी यांच्याकडून स्पॉन्सर होत आहे. त्यासोबत आतापर्यंतच्या तिच्या तयारीत आणि शूटमध्ये जळगावची हेअर अँड मेकअप आर्टिस्ट अमृता भोगरे यांचा महत्वाचा वाटा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा