गोल पोस्ट महाराष्ट्र अजित पवारांच्या खुशालीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं खंडोबाला अभिषेक

अजित पवारांच्या खुशालीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं खंडोबाला अभिषेक

पुरंदर, २९ ऑक्टोबर २०२०: कोरोनाची लागण झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बेत लवकर सुधारावी म्हणून आज गुरुवार दि. २९ रोजी सकाळी जेजुरी गड्याच्या पायथ्याला पहिल्या पायरीवर पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं दुग्धाभीषेक करण्यात आला. दादा लवकरात लवकर बरे होऊ देत आणि राज्यातील कामकाज सुरू होऊ देत असे साकडे घालत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, जेजुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष पुष्कराज जाधव, युवक उपाध्यक्ष अक्षय निगडे, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, गणेश होले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, राष्ट्रवादी युवक जेजुरी शहराध्यक्ष वैभव कोरफड, विद्यार्थी अध्यक्ष तुषार दरेकर, सचिन टेकवडे, अभय थोपटे, राहुल नाणेकर, ओबीसी अध्यक्ष राहुल भोंगळे, अतुल जगताप, इत्यादी यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं अशी प्रार्थना खंडोबा चरणी यावेळी करण्यात आली. तर अजित पवारांची तब्बेत सुधारण्यासाठी अभिषेक ही करण्यात आला.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version