गोल पोस्ट इतर राजकारण खा. डॉ. अमोल कोल्हे यांना “संसदरत्न पुरस्कार” जाहीर

खा. डॉ. अमोल कोल्हे यांना “संसदरत्न पुरस्कार” जाहीर

शिरूर, २४ जून २०२० : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सतराव्या लोकसभेच्या पहिल्यावर्षीच “संसदरत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे .

संसदेमध्ये लोकहितासाठी सतत आवाज उठवून सर्वाधिक प्रश्न मांडणा-या खासदारांपैकी एक असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यावर खा. डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, “शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला सेवा करण्याची संधी दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे हा पुरस्कार हा सन्मान मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तिचा आहे, म्हणून मी हा पुरस्कार तुम्हा सर्वांना अर्पण करतो . ”

ते म्हणाले की, ” पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन आणि लोकसभेतील आमच्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मला झाला म्हणूनच पहिल्या टर्मच्या पहिल्या वर्षी मी “संसदरत्न पुरस्कार” चा मानकरी ठरलो .

या पुरस्काराने आनंद निश्चितच झाला असला तरी माझ्यावरील जबाबदारीची जाणीवही मला आहे. आपणा सर्वांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मला आपल्या शुभेच्छा, आशिर्वाद व उर्जा मिळावी हिच मी इच्छा व्यक्त करतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version