खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : भाजप खासदार संजय काकडे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबई येथिल निवासस्थानी दाखल झाले आहेत.आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील सिल्हर ओकवर पोहोचले आहेत. काकडे आणि अजित पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. यामुळे कदाचित काकडे दोन्ही पवारांमध्ये समेट घडवू आणण्याचा प्रयत्न करू शकतात.
भाजपकडे १०५ आमदार आहेत.
त्यांना १४ अपक्षांचा पाठिंबा आहे. शिवसेनेसोबत असलेल्या सातपैकी तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आपल्याला मिळेल, असा भाजपचा दावा आहे. ते खरे ठरले तर हे संख्याबळ १२२ होईल. तरीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी २३ आमदारांची आवश्यकता असेल. अजित पवार यांच्या नेतृत्वात किती आमदार फुटतील यावर अवलंबून असेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा