खासदारांची एंट्री आणि टीकेच्या फैरी

पुणे, दि.२२ मे प्रतिनिधी : एकीकडे पुणेकर कोरोनाशी लढत आहेत.दुसरीकडे मात्र भाजपकडून राजकारण तापावण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. आज भाजपकडून काळे झेंडे दाखवा आंदोलन केले जाणार असून, सरकार करत असलेल्या कामकाजाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडे पुण्याचे खासदार गिरीश बापट ५७ दिवसानंतर अचानक महापालिकेत दाखल होतात. आणि पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठवतात. यातून राजकारण्यांना काय साध्य करायचे आहे, हे समजणे तस फार अवघड आहे.

मात्र, या विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून जशाच तसे उत्तर दिले जात असल्याचे पहायला मिळत आहे. माजी महापौर प्रशांत जगताप यांनी खासदारांच्या टीकेला सडेतोड उत्तरे दिली आहेत. पालकमंत्री ज्या प्रमाणे काम करत आहेत. ते अत्यंत छान आणि काळजी घेणारे आहे, मात्र आपण बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर आलात, जनता संकटात असताना आपण कुठे होतात, याचे उत्तर आधी द्यावे मग बाकीच्या गोष्टी बोलाव्यात. असे त्यांनी सांगितले.

मात्र, अशा संकटाच्या काळात खरंच अस राजकारण करणं गरजेचं आहे का? कारण सर्वजण या लढ्याला तोंड देत असताना त्यांच्या लढ्यात सामील होऊन साथ देणं गरजेचं असताना भाजपकडून दे कुठलं राजकारण केलं जातं आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.

आपल्याकडे १०० नगरसेवक असताना व ७०४० कोटींचे बजेट असून पुण्यात मनपात सत्ता असताना पुणेकरांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा, तुमच्या पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एकहाती सत्ता असणाऱ्या केंद्र सरकारकडून पुणे शहराला व महाराष्ट्राला काय मदत मिळवून दिली याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी महापौरांकडून करण्यात आली.
पुणे भाजपाकडून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्यात आली त्यावेळेस महाराष्ट्र धर्म का विसरलात,याचा खुलासा त्यांनी करावा.

आणखी खुप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण बापटांना या सर्वांचा हिशोब ह्या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत तथा जाहीर व्यासपीठावर नक्कीच देवू , पण प्रथम आम्ही विचारलेल्या प्रश्नांना बापटांनी उत्तर देवून पुणेकरांसमोर खुलासा करावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
मात्र, असे राजकारण करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या कोरोनाशी सर्वांनी एकजुटीने लढण्याची गरज असून राजकारण करण्याची गरज नाही…

– प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा