खेड तालुक्यातील पाणी टंचाई होणार कमी

41

राजगुरूनगर : खेड तालुक्यात यंदा परतीच्या आणि अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र जलस्त्रोत अटोकाठ तुंडुब भरल्याने रब्बीतील आणि उन्हाळी पिकांना फायदा होण्याबरोबरच पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार असल्याचे पहावयास मिळत आहे.
खेड तालुक्यात नद्यांवरील कोल्हापुर बंधारे ओसांडुन वहात आहे. लघु पाटबंधारे विभागाचे आणि पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागा (जलसंधारण विभाग) चे ओढ्यावरील बंधारे, पाझरतलाव, कृषी विभागाचे सिमेंट बंधारे तर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील वाफगाव आणि कडुस येथील माती धरणे तुंडुब भरुन ओसांडुन गेली आहे. तसेच विहिरींची भुजल पातळीमुळे पिकांसाठी लागणारे पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता शेतक-यांसाठी झाली. जलयुक्त शिवारातंर्गत ठिकठिकाणी झालेल्या ओढा करणाची कामे, पाझर तलावातील गाळ उपशामुळे पाणी साठ्यात वाढ झाल्याने कोरडवाहु शेतीतील रब्बी हंगामातील पिकांना वरदान ठरणार आहे.
खेड पंचायत समितीच्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील ओढ्यावरील ६९ बंधाऱ्यांना वेळेवर ढापे बसवून पाणी अडविल्याने रब्बीतील गहु, हरभरा, ज्वारी आदि पिकांना एक दोन वेळेस पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. जवळपास ३०० हेक्टर क्षेत्राला उपयोग होणार आहे. तर ६१ पाझर तलावंपैकी ४१ पाझारतलाव पुर्ण क्षमतेने भरले आहेत. या तलावातंर्गत पाणीसाठ्यामुळे ४ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.२० पाझर तलावांची गळती आणि साडंव्याच्या नादुरुस्तीमुळे निकामी होत असल्यामुळे या बंधाऱ्यांची कामे होणे आवश्यक आहे. पुर्व पट्ट्यातील आदर्श गाव गोसासी गावाचा १९७२-७३ सालातील पाझरतलावाची गळती होत असल्याने तलाव असुनही ग्रामस्थांना पाणी टंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागत होते.
अखेर जिल्हा परीषदेने २०१८-१९ मध्ये १४ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने या पाझर तलावांची गळती थाबंवण्यासाठी पंचायत समितीचे जलसंधारण विभागाचे उप अभियंता दिपक गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता ज्ञानेश्वर उभे यांनी वेगळ्या पध्दतीचा दुरुस्तीसाठी वापर केला. पाझर तलावाची माती काढुन आवश्यक माती भरण करुन मातीवर प्लास्टीक कागदाचे आवरण टाकण्यात येऊन त्यावर दगडीचे पिंचिग करण्यात आल्याने पाझरतलाव पुर्ण क्षमतेने भरुन साडंव्यावरुन पाणी वहात आहे. या वेगळ्या पध्दतीने केलेल्या प्रयोगामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर अनेक पाझरतलावांसाठी हा प्रयोग वरदान ठरणार आहे. पावसाळा संपल्यानंतर गोसासी पाझर तलाव डिसेंबर पर्यत कोरडा पडत होता. आता हा पाझर तलाव तुडुंब भरुन आहे. त्यामुळे गळती थाबंवण्यात जलसंधारण विभागाला यश आल्याचे सध्या तरी दिसत आहे. पहिल्यांदाच पाझर तलाव काठोकाठ भरल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाई समस्या सुटेल अशी आशा बाळगुन आहेत. पाझरतलावाच्या माती बांधावर प्लास्टिक कागद अथंरुन पाणी गळती रोखण्यात यश आले तर हा पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
याबाबत जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता डी.बी.उभे म्हणाले की, गोसासी येथील पाझर तलावात पाणी राहात नव्हते. यावरुन स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून पाझर तलावाची तळातील माती काढुन नवीन मातीभरण करुन या माती बांधावर तळापासुन टिकावू आणि मजबुत प्लास्टीक कागद अथंरुन त्यावर दगडी पिंचिग करण्यात आले. सध्या हा पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला असला तरी उन्हाळ्यापर्यत या प्रयोगाचे निखराणी निरीक्षण केले जाणार आहे. शेवटपर्यत पाणी टिकुन राहिल अशी खात्री आहे. या गावाची पाणी टंचाईची समस्या दुर करण्यात यश आल्याचे समाधान मिळणार आहे.
गोसासी गावाला शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहे. लोक सहभागातुन अनेक विकासाची कामे उभी राहिली. मात्र पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरेशे यश आले नाही. पाझर तलाव हा एकमेव पाणी टंचाईवर मात करता येईल अपेक्षा होती. पण दुरुस्तीला निधी मिळत नसल्यामुळे अडचण होती.जलयुक्त शिवार योजनेतुन १४ लाखांचा निधी मिळुन काम पुर्ण होऊन पहिल्यांदाच पाझरतलाव तुडुंब भरल्याचे पहावयास मिळत आहे. यावरुन आमच्या गावची पाणी टंचाई निश्चितच दुर होईल. हे या पाणी साठ्यावरुन म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया आदर्श गोसासी गावचे आदर्श माजी सरपंच किसनराव गोरडे यांनी दिली.
एकुणच नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या अवकाळी पावसाने खरीप वाया गेला असला तरी रब्बी हंगामाबरोबरच उन्हाळी बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे उपलब्ध, मुबलक पाणी साठ्यावरुन दिसुन येते. तसेच तालुक्यातील चासकमान, कळमोडी आणि भामाआसखेड धरणात शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध असुन या धरणातील पाण्याची आवर्तनांचे नियोजन सध्यातरी लाबंणीवर पडणार असले तरी या आवर्तनाबाबत वेळीच योग्य नियोजन करुन जाहिर करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा