‘खेलो इंडिया’ युथ गेम्स’ मध्ये विराजला मिळाले रौप्य पदक

आसाम:’खेलो इंडिया’ युथ गेम्स १० जानेवारी रोजी आसामची राजधानी गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी देशभरातील खेळाडूंनी उत्साहाने भाग घेतला होता. यूथ गेम्स मध्ये ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ६८०० खेळाडूंनी २० स्पर्धांमध्ये भाग घेतला.या स्पर्धा १० ते २२ जानेवारी दरम्यान चालतील.

या स्पर्धेतील कुस्ती विभागांमध्ये पुण्यामधील औंध येथील विराज विकास रानवडे या मल्लाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये त्याने सिल्वर मेडल आपल्या नावे केले आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय आहे. एवढेच नव्हे तर विराज ने सुवर्णपदक देखील पटकावले असते परंतु सेमीफायनलमध्ये पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो फायनल मध्ये खेळू शकला नाही.

अशी केली कामगिरी:                                                                                                        राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत खेळण्यासाठी विराज रानडे याने कठोर सराव केला होता. केलेल्या या परिश्रमाचे फळ त्याला या स्पर्धेमधून बघायला मिळाले. या स्पर्धेमध्ये त्याने विविध राज्यांतील खेळाडूंना पराभूत केले होते. दिल्ली, पंजाब, बिहार, मध्यप्रदेश व इतर राज्य संघातील खेळाडूंना पराभूत करून तो सेमी फायनल मध्ये पोहोचला होता.

सेमीफायनलमध्ये विराज ने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला पराभूत करून त्याने फायनलमध्ये धडक मारली. सेमीफायनल दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली. या कारणास्तव त्याला फायनल मध्ये खेळता आले नाही. झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या हातून सुवर्णपदक गेले; परंतु एकूणच त्याने या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेसाठी त्याने औंध कुस्ती केंद्रांमध्ये सराव केला होता. एन.आय.एस. कोच किशोर नखाते, पै. सचिन सोनवणे, पैं. व कोच अभिषेक कांबळे सर, मा. राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य केदार कदम, राष्ट्रीय खेळाडू पै. तुषार सोमवंशी, शासकीय कोच, क्रीडा अधिकारी मा. संदीप वांजळे सर, शासकीय कोच राजाभाऊ कोळी सर या सर्वांचे विशेष मार्गदर्शन विराजला मिळाले. विराज चे वडील पै. विकास रानवडे हेदेखील पहिलवान असल्याने कुस्तीचा वारसा त्याला वडिलांकडूनच मिळाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा