पुण्यातल्या एका सजग दुकानदाराचं निरीक्षण. खूप अस्वस्थ करणारं आहे सगळं.
आपलं तथाकथित सुसंस्कृत शहर सामाजिक?? बेजबाबदारीचे नवेनवे उच्चांक करतय्……….
माझे किराणा मालाचे दुकान असून सद्धया माझ्या दुकानात पन्नास टक्के ग्राहक खालील वस्तूंना आहे
मॅगी, मॅगी मसाला चीज, बटर, पास्ता, मॅकरोनी, पास्ता मसाला, मेयोनीज, वेफर्स, फरसाण, मुरमुरे, पाणीपुरीच्या पुर्या, विविध प्रकारची बिस्किटे, इसेन्स, बेकिंग पावडर,चॉकलेट पावडर, कस्टर्ड पावडर, यीस्ट, टोमॅटो सॉस, रेड चिली ग्रीन चीली व सोया सॉस, विविध प्रकारचे सूप, नूडल्स ची पाकीटे, इन्स्टंट फूड्स ( गुलाबजाम, ढोकळा, डोसा , इडली इत्यादी) खाकरे, चायनीज मसाले, पावभाजी, सांबार व बिर्याणी मसाले, सरबताच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स, ड्राय फ्रुट्स्, जाम, चॉकलेट, कॅडबरी l
कृपया स्वतःशीच विचार करा की रांगा लावून खरेदी करण्या इतपत या वस्तू जीवनावश्यक आहेत का? प्रशासनाने आपणास दिलेल्या सवलतीचा आपण दुरूपयोग करीत आहोत. आपण जर असेच वागणार असू तर प्रशासनाने घेतलेली सर्व मेहनत वाया जाऊन लॉक डाऊन चा कालावधी वाढतच जाईल व पर्यायाने देश समाज व आपली अर्थव्यवस्था आणखीन संकटात येऊन आपण सर्वजण त्या मद्धे भरडले जाणार
लक्षात घ्या की हे संकट फार मोठे आहे व आपण हसण्यावारी घेत आहोत.
क्रृपया अन्न धान्य व पैसे जपून खर्च करा
ही वेळ रोज नव्या डिश करुन अन्न वाया घालवायची नाही.
आज वस्तुंचा पुरवठा होतोय, उद्या असलेच याची शाश्वती नाही.
जेवढे गरजेचं आहे तेवढं रांधा, वाढा, पण हौशीने रोज नवे प्रकार करुन उधळपट्टी टाळा.
भसाभस किराणा घेऊन संपवू नका. जे आहे त्यात, थोडक्यात भागवण्याचे हे दिवस आहेत.
संकट संपलं तरी ही महागाई काही काबूत येईल की नाही देव जाणे.
पुढील दिवस अवघड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरात पुरवठा कमी पडतोय.
आज रांगा लावून मिळतंय ते उद्या असेलच असं नाही.
उत्पादन/शेती करायला मनुष्यबळ मिळेल याची शाश्वती नाही.
पाणी, वीज, अन्न सर्व जपून वापरा.
लॉक डाऊनचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
सावध आणि सजग व्हा.. ही बराच काळ चालणारी लढाई आहे,
जीभेवर व खर्चांवर नियंत्रण ठेवा कोणाकोणाच्या नोकर्या व कामधंदे जातील व रहातील याची शाश्वती नाही.
बेजबाबदारपणे वागून स्वतः सह आपले कुटुंब आपला समाज व देशाला खड्ड्यात घालू नका
🙏🙏🙏🙏🙏🙏
यश ट्रेडर्स
84 शुक्रवार पेठ पुणे 2
9226246667
9226255567