Kia ची सर्वात महागडी SUV EV9 लवकरच भारतीय बाजारात

पुणे, ११ जुलै २०२३ : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याने अनेक वाहन कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत ई-कार ही हॅचबॅक आणि मध्यम आकाराच्या सेडानपुरती मर्यादित होती, तीने आता एसयूव्ही सेगमेंटमध्येही एन्ट्री घेतली आहे. अशातच किआ कंपनी, नविन इलेक्ट्रिक SUV EV9 कार पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. कोरियन ऑटो निर्मात्याने आपली सर्वोत्तम इलेक्ट्रिक SUV EV9 चे सादरीकरण केले आहे. ऑटो एक्सपो २०२३ मध्ये कंपनीने ही एक कॉन्सेप्ट कार म्हणून दाखवली होती.

भारतीय बाजारात EV6 नंतर EV9 ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार असेल. या संदर्भात किआ इंडियाचे सीईओ
Tae-Jin Park, म्हणाले, “पुढच्या वर्षी आम्ही ग्राहकांसाठी EV9 कार आणणार आहोत. Kia भारतातील तिच्या इलेक्ट्रिक वाहनांसह टॉप-डाउन धोरण आखणार आहे. EV9 ही Kia ची आशिया मध्येच नाही तर जागतिक स्तरावर सर्वात महागडी आणि सर्वात मोठी आणि लक्झरी इलेक्ट्रिक SUV कार असणार आहे.

Kia India ने Kia 2.0 नावाच्या नवीन ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रॅटेजीचा खुलासा केला आहे. यामध्ये, कंपनीने पुढील काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत १०% मार्केट शेअर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. Kia 2.0 धोरणाचा भाग म्हणून, Kia EV9 सारखे नवीन मॉडेल बाजारात आणायचे आणि देशामध्ये त्याचा व्हॉल्यूम आणि मार्केट कॅप वाढवणे हे कंपनीचे धोरण असणार आहे.

Kia EV9 बॅटरी, पॉवरट्रेन आणि रेंज
आंतरराष्ट्रीय स्तरावर EV9 वर तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. याची सुरुवात EV9 RWD पासून होते. यामध्ये 76.1 kWh ची बॅटरी आहे, तसेच यामध्ये 160kw मोटार रीअर बसवली जाते. ही कार 215hp आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. Kia च्या मते EV9 मध्ये 358km रेंज आहे.

Kia EV9 यामध्ये ६४kWh ची बॅटरी पॅक मिळू शकतो ज्याला केवळ ७ मिनिटात २० ते ८० टक्के पर्यंत चार्ज करता येवू शकते. इलेक्ट्रिक SUV ला ड्युअल मोटर सेटअप आणि 4WD (फोर-व्हील ड्राइव) ड्राइवट्रेन सारखेच सिस्टम सोबत आणले जाण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक असूनही ही कार ऑल व्हील ड्राइव्ह प्रणालीसह लॉन्च केली जाणार आहे. ही कार २ इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे चालविली जाईल. Kia EV9 इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ४८३ किमी रेंज देते असा रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे. तसेच Kia चा दुसरा पॉवरट्रेन पर्याय EV9 RWD लाँग रेंज आहे. यात 99.8 kWh बॅटरी आणि 150kw (201hp) मोटर मिळते. हे टॉप स्पेक EV9 AWD ला दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळतात जे एकत्रित 283 kW (380hp आणि 600Nm) टॉर्क जनरेट करतात.

कारच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यात दोन टोन डॅशबोर्ड, मोठा सेंट्रल कन्सोल, दोन स्पोक मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, १२.३ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, तितकेच मोठे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल.
दुसरीकडे, जर आपण कारच्या बाहेरील भागाबद्दल बोललो तर, तिला फ्लॅट बोनेट, तसेच एस शेप डीआरएल, स्वॅप बॅक हेडलॅम्प, छतावरील रेल, ब्लॅक पिलर, शार्क फिन अँटेना, रॅक केलेले विंडस्क्रीन असे अनेक युनिक लुक आहेत.

EV9 ची किंमत बदल बोलायचं झाल्यास परदेशातील इतर बाजारपेठांप्रमाणे EV9 ही भारतातील सर्वात महागडी कार असणार आहे. Kia ने भारतीय मार्केटमध्ये EV9 ची किंमत 1 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता सांगितली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा