३२ सेफ्टी फीचर्स सोबत Kia ची Seltos Facelift भारतात लाँच

नवी दिल्ली, ५ जुलै २०२३ : कोरियन ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Kia ने २०१९ मध्ये सेल्टोससह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि या SUV ने किया कंपनीला नाव मिळवुन देण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली. आता जवळपास ४ वर्षांनंतर, सेल्टोस अपडेट होत आहे. आता kia ने २०२३ ‘किया सेल्टोस फेसलिफ्ट’ लाँच केली आहे.

कोरियन ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Kia ची सर्वाधिक विक्री होणारी कार Seltos Facelift चे सादरीकरण करण्यात आले आहे. कंपनीच्या विक्री आणि विपणन प्रमुखाने ही माहिती दिली. नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ADAS फीचर मिळणार आहे. २०२३ Kia Seltos फेसलिफ्टमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट आणि स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग यासह अधिक प्रगत ड्रायव्हर सहाय्य वैशिष्ट्ये आहेत.

२०२३ Kia Seltos कारमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार ३ पॉवरट्रेन आणि ५ ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, या नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, त्यापैकी १७ ADAS वैशिष्ट्ये आहेत तर १५ सुरक्षा वैशिष्ट्ये अशी आहेत.

२०२३ Kia Seltos फेसलिफ्टला नवीन पेट्रोल इंजिन १.५-लीटर टर्बो, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल एसयूव्ही बनवते. यामध्ये AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय आहेत. तसेच या मध्ये ही आणखी दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. Kia Motors ने अद्ययावत सेल्टोस अशा वैशिष्ट्यांसह सादर केली आहे.

Kia Seltos Facelift सुरक्षा २०२३ सेल्टोस ८ सिंगल टोन, २ ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे. २०२३ सेल्टोसच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन नवीन सेल्टोसमध्ये ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल असिस्टं, ब्रेक असिस्ट, एबीएस आणि ईबीडी तसेच इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण मिळेल. आणि बरेच काही समाविष्ट आहे. या शिवाय रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्सही कायम ठेवण्यात आले आहेत.

२०२३ Kia Seltos Facelift साठी बुकिंग १४ जुलैपासून सुरु होईल. नवीन Kia Seltos ची किंमत अंदाजे ११ लाख रुपये असू शकते. लॉन्च होण्यापूर्वीच लोकांमध्ये याबद्दल प्रचंड क्रेझ आहे. आणि या सेगमेंटमध्ये कीया आगामी काळात Hyundai- Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider या सारख्या वाहनांसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा