पुण्यातील नाईटलाइफ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! 🌃
राजा बहादूर मिल कंपाऊंडमधील ‘किकी पब’ मध्ये आयोजित अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या फ्रेशर पार्टीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.
🔹 टेरेस पार्टीमुळे वाद:
या पबने टेरेसवर परवानगीशिवाय मद्यपानाची व्यवस्था केल्याचं समोर आलं आहे. नियमानुसार टेरेस रेस्टॉरंट व पबना अशी परवानगी नसतानाही हे नियम मोडले जात असल्याचं उघड झालं.
🔹 अल्पवयीनांना प्रवेश:
फ्रेशर पार्टीसाठी अनेक अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. ही बाब समोर येताच, मनसेने उत्पादन शुल्क विभागा कडे तक्रार दाखल केली.
🔹 दिरंगाईमुळे प्रश्नचिन्हे:
मनसेच्या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाला घटनास्थळी पोहोचायला तब्बल तीन तास लागले, तर आयोजकांच्या तक्रारीवरून पोलिस अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. या दुहेरी भूमिकेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाला आहे.
🔹 पब्सवरील कारवाईची मागणी:
राजा बहादूर मिल परिसरातील अनेक पबमध्ये नियमबाह्य व्यवहार सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ जुजबी कारवाईमुळे पबचालकांचे फावतं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
किकी पब वाद आता पुण्यातील नाईटलाइफ, परवाने आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठी चर्चा रंगवतोय.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































