राजगुरूनगर प्रतिनिधी: छ. शिवराय व शंभुराजे भेट पालखी सोहळा दि.५ जाने.२०२० ते १३ जाने २०२० या कालावधी मध्ये संपन्न होणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज व शंभुराजे या पिता पुत्राची भेट आखेरच्या क्षणी होऊ शकली नाही महाराजांनी शंभु राजांची आठवण करतच आपला देह ठेवला अंत समयास आपल्या युवराजांची भेट व्हावी ही महाराजांची इच्छा अपुर्ण राहीली. या भेटीची खंत दोन्ही छत्रपतींच्या मनात तशीच राहीली ही आधुरी राहीलेली भेट व्हावी यासाठी ह.भ.प बाजीराव महाराज बांगर शिवचरित्र व शुंभुचरित्र कथाकार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजे व शंभुराजे भेट पालखी सोहळा वर्ष दुसरे हि मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या पालखी सोहळ्याचा मार्ग किल्ले शिवनेरी वरुन प्रस्थान छत्रपती शिवरायांना पंचगंगाचा अभिषेक पुजा व शिवाई देवीची पुजा आरती व गोंधळ करून पालखी प्रस्थान करेल. मार्ग जुन्नर नारायणगाव, कळंब मंचर पेठ, खेड (राजगुरूनगर) चिंबळीफाटा मार्गे श्री क्षेत्र आळंदी(ज्ञानोबारायांचे दर्शन), श्री क्षेत्र तुळापुर येथे त्रिवेणी संगमावर राजांना स्नान श्री क्षेत्र वढु बुद्रूक येथे शुंभुराजांना मानवंदना व आरती केली जाईल. केसनंद श्री क्षेत्र थेऊर गणपती (अभिषेक व पुजा) लोणी काळभोर वडकी नाला दिवेघाट मार्गे सासवड कोंडीत श्री क्षेत्र नारायणपूर व किल्ले पुरंदर येथे भेटीचा सोहळा संपन्न होईल. दररोज मुक्कामी प्रबोधन व्याख्यान शाहीर पोवाडे, मर्दानी खेळाची पथक याचे सादरीकरण होणार आहे तरी या ऐतिहासीक पालखी सोहळ्यास तमाम शिवशंभुप्रेमी नागरीकांनी सहभागी व्हावे. या पालखी सोहळ्यासाठी श्रीरामपूर तालुकयातुन सांगली, ठाणे, नाशिक, जुन्नर, खेड, आंबेगाव येथून या पालखी सोहळ्यासाठी शिवशंभु भक्त व बजरंग दल कार्यकर्ते सहभागी होतात. अशी माहीती स्वराज्य संघाचे सचिव शामकांत निघोट साहेब व कार्यध्याक्ष ज्ञानेश्वर भांगे यांनी दिली.