किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

70

पुरंदर किल्ला

“पुरंदर म्हणजे इंद्र. ज्या प्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य होते तसाच हा पुरंदर किल्ला. इतिहासाच्या जुन्या नोंदीमध्ये या डोंगराला इंद्रनील असे नाव देण्यात आले होते. भगवान हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना या पर्वताचा काही भाग खाली पडला होता तोच हा इंद्रनील पर्वत.”

बहमनी काळात बेडरचे इंद्रसंपत देशपांडे यांनी बहमनी सरकारकडून पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदर किल्ल्याचे पूर्णनिर्मान करण्यास सुरुवात केली. यानंतर महादजी नीलकंठ यांनी कसोशीने ते काम पूर्ण केले. पुरंदर किल्ल्यावर शेंदऱ्या बुरीनज बांधताना तो सारखा ढासळत असे, तेव्हा बहिरनाईक सोन नाक यांनी पुत्र नाथनाक आणि सून देवा काई अशी दोन मुलांचा त्यात बळी दिला. त्या नंतर हा बुरुंज उभा राहिला.अशी इतिहासात नोंद आहे.

सन १४८९ मध्ये एका निजामशाही सरदाराने हा किल्ला जिंकून घेतला. १६४९ आदिलशहाने शहाजीराजांना याच किल्ल्यावर कैद केले होते.मात्र त्याच वेळी शिवाजी महाराज अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेत होते. त्यामुळे शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फार जोखमीची होती.एकीकडे वडील कैदेत तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणारं होते. त्यावेळी महाराजांनी लढाईसाठी पुरंदर किल्ला ही जागा निवडली. मात्र तेव्हा गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीळकंठ यांच्या ताब्यात तेव्हा पुरंदर होता.
परंतु त्या दोन भावांमधील भांडणाचा फायदा उचलून शिवाजी महाराजांनी किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली. आणि लढाई जिंकली. त्यावेळी शिवाजी महाराजांना या मोठ्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले होते.

१६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यांना पुरंदर किल्ल्यावर सरनोबत म्हणून नेमले.वै. शु १२ शके १५७९मध्ये म्हणजे १२मे १६५७ मध्ये गुरुवारी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला, अशी इतिहासात नोंद आढळते. मार्च १६७०मध्ये निळोपंत मुजुमदार यांनी किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे ना “आझमगड” असे ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने सचिव शंकराजी नारायण यांनी मोगलांशी भांडून पुरंदर पुन्हा स्वराज्यात आणला. त्यानंतर १६९५मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती.१६९७मध्ये गंगाबाई पेशवे यांना पुरंदरवर मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव असे होते. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

तसे पहायला गेले तर पुरंदर किल्ला विस्ताराने खूप मोठा आहे. मजबुतही आहे.शिवाय लपण्यासाठी मोठी जागाही आहे. त्यावेळी गडावर दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करता येत असे. पुरंदर किल्ल्याची एक बाजू सोडली तर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरुन समोरच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. पुरंदर किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा मानला जात असे.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा