“पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला एक घाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघटमार्गे जाण्यासाठी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उवयोग केला जात होता. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेस येतो.”
११ जून १६६५ रोजी जयसिंगला दिलेल्या किल्ल्यापैकी तुंग हा एक किल्ला होय. या किल्ल्याला तशी वैभवशाली परंपरा लाभलेली नाही. परंतु १६५७मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा ही किल्ला स्वराज्यात सामील झाला होता.
१६६० या भागाचा सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती केली गेली.
जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६मे १६६५रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले काही त्यांना जिंकता आले नाही. १६ जून १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार १८जूनला कुबादखानाने हलाल खान व इतर दोन सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला.
तुंग किल्ला हा भारताच्या इतिहासात जरी नसला जतरी त्याला स्वराज्यात महत्वाचे स्थान होते. तुंग किल्ला फिरण्याच्या दृष्टीने चांगलेच विचार असणे गरजेचे आहे. सध्या मुले ट्रेकिंगला जाताना या किल्ल्याचा वापर होऊ लागला आहे. तुंग किल्ला हिरवाईने नटलेला असून दिसायला आकर्षक आहे. त्यामुळे पर्यटकांचे केंद्रबिंदू ठरू लागला आहे.
जरी हा किल्ला इतिहासात आपले स्थान निर्माण करू शकला नसला तरी त्याने आपली ओळख निर्माण करून ठेवली आहे. त्यामुळे इतिहासात त्याला महत्व नक्कीच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला सुंदर असून भटकंती करण्यासाठी किल्ल्यावर सुंदर ठिकाणे आहेत.
-प्रशांत श्रीमंदिलकर