किल्ल्यांनी जपला… ऐतिहासिक वारसा

वसंतगड

“वसंतगड हा किल्ला पुणे-बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कराड या दोन गावांच्या मध्ये वसलेला आहे. तलबीड हे गाव वसांगडाच्या पायथ्याचे गाव आहे. वसंत गडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली.”

इ.स.१६५९मध्ये शिवाजी महाराजांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतल्याची नोंद आहे. मसुरचे पूर्वापार जहागिरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसुरच्या जगदाळेनी आदिलशाहीची परंपरेने चाकरी केली. महादजी जगदाळे हे शाही नोकर म्हणून अफजलखानाच्या सांगती प्रतापगडाच्या आखाड्यात उतरले. त्यात खानाला संपवले. त्यात त्यांनी शाही फौजेची दाणादाण उडवून दिली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांच्या हातात जिवंत सापडला.

त्यावेळी महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला. याच महादजीला दहा वर्षाचा पोरगा होता. त्या मुलाला माता जिजाऊंनी मुलाच्या मायेने त्या मुलाला संभाळले.त्याला हुशार केला. पुढे जिंजी हुन आल्यानंतर राजाराम महाराज वसंतगडावर मुक्कामी राहिले होते. असे अभ्यासक सांगतात.

इ.स.१७००मध्ये अफजलखानने वसंतगड जिंकला. व त्याचे नाव “किली द फतेह”असे ठेवले होते. परंतु १७०८मध्ये मराठ्यांनी अफजलखानाला हरवून हा किल्ला पुन्हा जिंकला. वसंतगड हा दिसायला आकर्षक आहे. त्यावर अनेक राजे महाराजे मुक्काम करण्यासाठी येत असत. पावसाळ्यामध्ये हा किल्ला हिरवाईने नटल्यावर सुंदर दिसतो.                   

                                                                                                           -प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा