किल्ले प्रतापगड
“जेव्हा १६५६मध्ये चंद्रराव मौर्याक चा पराभव करून शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात “भोरप्या डोंगर” रुबाबात एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची जबाबदारी शिवाजी राजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे यांना दिली, महाराजांनी दिलेली जबाबदारी मोरोपंत यांनी दुर्ग बांधणीचे कौशल्यपणाला लावले. १६५८ साली एक बुलंद आणि धीपाड किल्ला तयार झाला. त्याचे नाव ठेवले प्रतापगड.”
ज्यावेळी अफजलखान प्रचंड सैन्यानिशी १६५९साली चालून आला.त्यावेळी महाराजांनी युक्ती करून त्याला जावळीच्या खोऱ्यात आणले. ९नोव्हेंबर १६५९रोजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. आणि त्याच्या सैन्याला गनिमी काव्याने ठार केले.आणि स्वराज्यावर आलेले मोठे संकट उधळून लावले. इ.स.१६६१ मध्ये महाराजांनी गडावर भवानी देवीची स्थापना केली. इ.१६५९ ते १८१८पर्यंत हा किल्ला (काही काळ वगळता) शत्रूला जिंकता आला नाही.
जेव्हा अफजलखानाने दगा केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला मारले व संभाजी कावजी या मर्दाने अफजलखानाचे शीर या बुरुजात पुरले. असे इतिहासात सांगितले आहे. भवानी देवीच्या नगरखाण्याची खिडकी उघडून पाहिल्यास देवीचा चेहेरा दिसतो.अशी आख्यायिका आहे. शिवाजी राजांनी देवीची रोज सनइ चौघडे वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. त्यावेळी हडप नावाचा पुजारी भवानी देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवीत असे. या भवानी मंदिरात सभामंडप व नगरखाने आहेत.
विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो.१४००फूट लांबी आणि ४००फूट उंची एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडांच्या तुलनेत या गडाला चांगली मजबूत अशी तटबंदी आहे. वायव्येकडे ८००फुटातून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या दोन तळी आहेत. यातून कोयनेचे खोरे फारच सुंदर दिसते. आणि येथेच किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
स्वराज्याच्या इतिहासात प्रतापगडाला महत्वाचे स्थान आहे. अनेक घटनांचा प्रतापगड साक्षीदार आहे. असे इतिहासकारांचे मत आहे. प्रतापगड महाराजांनी खास त्यांच्या शैलीत बांधून घेतलेला किल्ला आहे.
-प्रशांत श्रीमंदिलकर