किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

किल्ले वारुगड

“सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव डोंगर रांग गेलेली आहे. त्या पूर्व पश्चिम दिशेने धावणाऱ्या डोंगर रांगेत वारुगड हा बसलेला आढळतो. असे इतिहासकार सांगतात.”

वारुगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ९०६मीटर इतकी आहे. वारुगड हा किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा मानला जातो. वारुगड जिथून माणगंगा नदी उगम पावते.बट्या सिताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीला आहे. वारुगड हा दहिवडी गावापासून वीस मैलांच्या अंतरावर असल्याचे पाहायला मिळते.

वारुगड हा शिवाजी महाराजांनी बांधला अशी माहिती आहे. परंतु विसापूरवरून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच स्वराज्याची साताऱ्याकडील बाजू मजबूत करावी यासाठी शिवाजी महाराजांनी संतोषगड आणि वारुगड हे दोन किल्ले निर्माण केले असावेत. त्यात वारुगडाचा किल्लेदार परभू जातीचा होता. या किल्ल्यावर दोनशे पहारेकरी आणि बरीच शिबंदी होती. वारुगड हा साताऱ्याच्या राजाच्या विठ्ठलपंत फडणवीस याने दोनशे सैन्य पाठवून १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावकडून घेतला.

वारुगडाचे बांधकाम भक्कम असून किल्ल्याचा मुख्य फलटण दरवाजा गोमुखी बांधणीचा बांधलेला आहे. किल्ल्याच्या कमानी ढासळलेल्या आहेत. तटबंदीवरील बुरुजांनाही तडे गेलेले पाहायला मिळतात. किल्ल्याची दोन भागात विभागणी करता येते. त्यात एक म्हणजे गडाची माची आणि दुसरा म्हणजे बालेकिल्ला. बालेकिल्ला हा दिसायला आकर्षक आहे. परंतु त्याची बांधणीची कमकुवत होत असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. तिथून खालपर्यंत बांधलेली भिंत जमिनोदस्त होत चालली आहे.ब्या भिंतीवरूनच बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे.

वारुगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा सातारा परिसरात पाया अजून भक्कम करता यावा यासाठी बांधला होता. यातून साताराकडील बाजू भक्कम करण्यास महाराजांना मोठी मदत झाली. वारुगड हा ट्रेकर्ससाठी खूप लाभदायक असा आहे. स्वराज्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला महत्वाचा मानला जातो. अशी इतिहासात याची नोंद पहायला मिळते.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा