किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

जीवधन किल्ला

“आपण आपल्या भारताच्या इतिहासातून अनेक किल्ल्यांची माहिती घेत असतो. इतिहासामध्ये किल्ल्यांना विशेष महत्व दिले गेले आहे. असाच एक किल्ला पुण्यापासून ६५ मैल वायव्य दिशेला व जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेस १६मैल जीवनधन नावाचा किल्ला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३०००फूट उंच आहे.”

घाटघर खेड्याच्या सरहद्दीत या खेड्याचा समावेश होतो. सध्या किल्ल्याच्या चारही बाजूने कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यात कोकणाच्या बाजूचा भाग तर अतिशय खोल असल्याचे दिसते आहे.याची लांबी १००० तर उंची ५००यार्ड आहे. हा किल्ला जवळपास शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती असल्याचा भास होतो. असे अभ्यासकही सांगतात.

किल्ला चढण्यासाठी फक्त १किलोमीटरचे अंतर आहे .परंतु हे अंतर चढण्यासाठी अतिशय अवघड असे आहे. त्यामुळे किल्ला चढताना खूप वेळ लागतो. किल्ल्यावर काही बौद्ध लोकांच्या वेळच्या अतिशय कोरीव अशा लेण्या आहेत. या किल्ल्यावरून साष्टीच्या टेकड्या, तुंगार, वसई, कामनगड ही ठिकाणे व निरभ्र दिवशी समुद्र देखील पहायला मिळतो.

शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.असे अभ्यासकांकडून सांगण्यात येते. १७जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजमशाह म्हणून घोषित केले. स्वतः ते वजीर बनले.

या किल्ल्याचा दरवाजा कटलकड्यामध्ये कोरलेला असल्याने तो अतिशय सुबक आणि सुंदर दिसत आहे. त्यामुळे जीवधन किल्ला पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर हा किल्ला अनेक गोष्टींचा साक्षीदार असल्याचे इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. त्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा समावेश आहे.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा