गोल पोस्ट इतर किंग खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा रडारवर; हिंदू महासंघाकडून कोर्टात याचिका दाखल

किंग खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा रडारवर; हिंदू महासंघाकडून कोर्टात याचिका दाखल

पुणे, ५ डिसेंबर २०२२ : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक ( पालघर) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात क्रुझवर पकडले होते. त्याचप्रमाणे आर्यन खान याने गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांना पुढे मान्य केले होते. त्या आधारावर सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आर्यन खान सह त्याच्या सहकाऱ्यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत दोषारोपपत्रातून नावे वगळली, असा आरोप हिंदू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही ते न्यायालयात केसच्या दरम्यान टिकणार की नाही ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र, आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले, असा आरोप हिंदू महासंघाने केला.

दरम्यान, या संपूर्ण घटने विरोधात हिंदू महासंघाने १३ जुलै २०२२ रोजी कोर्टात आव्हान दिले आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफील राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपींना कशी मदत केली हे मुद्दे हिंदू महासंघाने उपस्थित केले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version