किंग कोहलीनं तोडला सचिन तेंडुलकरचा हा विक्रम

Virat Kohli Record, Ind Vs Sa, 20 जानेवारी 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीनं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. विराट कोहलीनं आपल्या डावात नववी धाव घेताच तो परदेशी भूमीवर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला.

आतापर्यंत हा विक्रम माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, मात्र आता विराट कोहलीने हा विक्रम मोडलाय. सचिन तेंडुलकरनं परदेशी भूमीवर 147 सामन्यात 5065 धावा केल्या, तर विराट कोहलीने केवळ 108 सामन्यात 5066 धावा केल्या.

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीला या विक्रमामुळं नक्कीच काहीसं मनोबल मिळंल. विशेष म्हणजे हा विक्रम करण्यासाठी विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरपेक्षा कमी सामने घेतले आहेत. दोघांमध्ये जवळपास 30 सामन्यांचं अंतर आहे.

परदेशी भूमीवर वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा-

•   108 सामने, 5066 धावा – विराट कोहली*
•   147 सामने, 5065 धावा – सचिन तेंडुलकर
• 145 सामने, 4520 धावा – एमएस धोनी
• •   117 सामने, 3998 धावा – राहुल द्रविड
• 100 सामने, 3468 धावा – सौरव गांगुली

विराट कोहलीचा परदेशी भूमीवरचा विक्रम पाहिला तर तो विलक्षण आहे. विराट कोहलीनं परदेशी भूमीवर 58 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर 20 शतकं आहेत. तर सचिन तेंडुलकरच्या नावावर परदेशी भूमीवर केवळ 12 शतकं आहेत.

ही मालिका विराट कोहलीसाठी खास

विशेष म्हणजे ही मालिका विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाची आहे. टी-20, वनडे आणि कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली प्रथमच फलंदाज म्हणून खेळत आहे. टी-20 विश्वचषकानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवलं. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीनंही कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा