रिंकू सिंगच्या धमाकेदार खेळीने KKR ने राजस्थानला हरवले, प्लेऑफच्या शर्यतीत कायम

30

KKR Vs RR IPL, 3 मे 2022: सोमवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने शानदार विजय नोंदवला. रिंकू सिंगच्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा (आरआर) 7 विकेट्सने पराभव केला. या विजयासह कोलकाताच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत.

कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला रिंकू सिंग, ज्याने 23 चेंडूत 42 धावांची तुफानी खेळी केली. रिंकू सिंगने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिंकू सिंगशिवाय नितीश राणाने 37 चेंडूत 48 धावा केल्या. नितीश राणाने आपल्या शानदार खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार लगावले.

या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोलकाताचे 10 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण आहेत, तर राजस्थान रॉयल्सचा हा चौथा पराभव आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे 12 गुण आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव

पहिली विकेट – आरोन फिंच 4 धावा, 16/1
दुसरी विकेट – बाबा इंद्रजीत 15 धावा, 32/2
तिसरी विकेट – श्रेयस अय्यर 34 धावा, 92/3

राजस्थान रॉयल्सचा डाव- (152/5)

राजस्थान रॉयल्ससाठी या डावाची सुरुवात चांगली झाली नाही, उमेश यादवच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सुरुवातीला राजस्थानच्या फलंदाजांना अडचणीत आणले. देवदत्त पडिक्कलही अवघ्या 2 धावा करून बाद झाला. या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरला यावेळी कोणतीही आश्चर्यकारक कामगिरी करता आली नाही आणि त्याला केवळ 22 धावा करता आल्या.

राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने 54 धावांची खेळी खेळली आणि एक टोक राखले. मात्र, संजू सॅमसनने 49 चेंडूत या धावा केल्या, त्यामुळे डाव अतिशय संथ ठरला. शेवटी, शिमरॉन हेटमायरच्या झंझावाती 27 धावांच्या जोरावर राजस्थानच्या संघाने 152 धावांपर्यंत मजल मारली.

पहिली विकेट – देवदत्त पडिक्कल 2 धावा, (7/1)
दुसरी विकेट- जोस बटलर 22 धावा (55/2)
तिसरी विकेट – करुण नायर 13 धावा (90/3)
चौथी विकेट- रियान पराग 19 धावा (115/4)
पाचवी विकेट- संजू सॅमसन 54 धावा (115/5)

कोलकाताने आपल्या संघात दोन बदल केले असून, शिवम मावीचे संघात पुनरागमन झाले आहे. मोठी गोष्ट म्हणजे व्यंकटेश अय्यरला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग-11: आरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, अंकुल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी

राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा