RR vs KKR IPL २०२५ Quinton de Kock brilliant 97 runs: क्विंटन डिकॉकच्या ९७ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर केकेआरने राजस्थानवर ८ विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. केकेआरने क्विंटन डिकॉकच्या ९७ धावांच्या प्रभावी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर विजय मिळवला आहे. हा सामाना गुहावटी येथे खेळवण्यात आला होता. जिथे मोठी धावसंख्या उभारण हे मोठ आव्हान होत. याशिवाय राजस्थानचा संघ या धावपट्टीवर मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. अथवा राजस्थान रॉयल्सकडून कोणताही खेळाडू चांगली फलंदाजी करू शकला नाही.
गुहावटीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने २० षटकांत १५१ धावा केल्या होत्या. यामुळे कोलकता संघाला हे लक्ष्य गाठण्यात फारशी अडचण आली नाही. कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे डी कॉक, ज्याने कोलकाताकडून खेळताना पहिलं अर्धशतक झळकावलं. डी कॉकने ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ९७ धावांची नाबाद खेळी केली.
गुहावटीच्या खेळपट्टी अवघड असल्याने कोलकाता संघाला पॉवरप्लेमध्ये जास्त धावा उभारता आल्या नाहीत. त्यांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांत केवळ ४० धावा केल्या. केकेआर संघाकडून कर्णधार अजिंक्य राहणे आणि सलामीवीर मोईन अली चांगली कामगिरी करू शकले नाही. पण क्विंटन डि-कॉकने मैदानच्या खेळपट्टीचा अंदाज घेत केकेआरला विजयाच्या शिखरावर पोहोचवल. त्याने आपले अर्धशकत ३६ धावांत पूर्ण केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर