यूएई, 21 सप्टेंबर 2021: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना काल शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या बंगळूरुची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात निराशाजनक झाली. मॉर्गनच्या कोलकाता संघाने धुव्वा उडवला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 10 ओव्हर आणि 9 गडी राखून पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्सने कालची रात्र गाजवली. चॅलेंजर्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. दिग्गजांनी बहरलेला संघ 19 षटकात अवघ्या 92 धांवात आटोपला होता. त्यांनी ठेवलेल्या अल्प दावसंख्येच लक्ष्य कोलकाता संघाने सहज पार केले.
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र विराटचा हा निर्णय पूर्णपणे फसला. पडिक्कलने 22 धावांची संघासाठी सर्वोत्तम खेळी केली. प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर यांनी 82 धावांची दमदार सलामी दिली. 13 धावांत 3 बळी घेणारा कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
बंगळुरूच्या धावसंख्येचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यानंतर अर्धशतकाला दोन धावा बाकी असताना यजुर्वेंद्र चहलने शुबमनला झेलबाद केले. शुबमनने 6 चौकार आणि एका षटकारासह 48 धावा केल्या. तर अय्यर 27 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 41 धावांवर नाबाद राहिला. कोलकाताने 10 षटक राखून बंगळुरूचे आव्हान पूर्ण केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे