५ फेब्रुवारी २०२५ नागपूर : नुकतीच झालेली पाच टी-20 मालिका भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ४-१ ने जिंकली असून आता टीम इंडिया कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका खेकळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून वनडे मालिका सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ६ फेब्रुवारीं पासून सुरू होणार असून आगामी सुरू होणाऱ्या मालिकेसाठी पूर्वतयारी म्हणून वनडे मालिकेकडे पाहिले जात आहे. यातच सर्व चाहत्यांचे लक्ष स्टार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे असणार आहे. या मालिकेत विराट कोहलीला इंग्लंडच्या वनडे मालिकेत वर्ड रेकॉर्ड करण्याची संधी मिळणार आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत १३४० धावा केल्या आहेत आणि जर त्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या मालिकेत ३६० धावा केल्या तर ५० षटकाच्या फॉरमॅटमध्ये इंगलंडविरुद्ध १७०० धावा करणारा जगतील पहिला फलंदाज ठरणार आहे.तर कोहली विक्रम आपल्या नावावर करणार का ? याकडे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत.
इंग्लंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :
ख्रिस गेल – १६६२
कुमार संगकार -१६२५
सर व्हिव्हियन रिचर्डन – १६१९
रिकी पॉटिंग – १५९८
माहेला जयवर्धन -१५६२
महेंद्रसिंग धोनी – १५४६
युवराज सिंग – १५२३
सचिन तेंडुलकर – १४५५
विराट कोहली – १३४०
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर