कोलदरे: पोहायला गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू.

आंबेगाव, दि. २२ मे २०२०: तालुक्याच्या कोलदरे येथे मुंबईतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आलेले उल्हास हिरामण काळे (वय ४२ वर्षे) व रोहन राजेंद्र काळे वय (१८ वर्षे) या काका पुतण्याचा घोड नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला आसून
कोलदरे व परिसरात या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हास काळे व रोहन काळे यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी गावी आले होते. रोहनने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. उल्हास यांचा मुंबई येथे कॉम्प्युटर स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू होता.
घोडनदीवर म्हसोबाचा डोह येथे आज सकाळी  हे दोघे पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर इतर तीन लहान मुले होती. उल्हास व रोहन काळे हे पोहण्यासाठी नदीत उतरले पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तीरावर उभी असलेली त्यांच्या घरातील इतर तिघांनी आरडाओरडा केला. घरी मोबाईल वरून फोन केले.

पुढील पंधरा ते वीस मिनिटात गावातून नागरिक आले. गावातील नागरिकांनी दोघांनाही बाहेर काढून खासगी गाडीतून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतापराव चिंचोलीकर यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा