कोल्हापूरातील कळंबा हनुमान नगर परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ७० वर्षीय रिक्षाचालक मोहन पोवार यांचा त्यांच्याच वर्गमित्राने आणि मित्राने, केवळ आईवरून झालेल्या शिवीगाळीच्या रागातून, गळा चिरून खून केला.
अवघ्या चार तासांत कोल्हापूर LCB आणि जुना राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला जेरबंद केले. अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव चंद्रकांत शेळके (७३, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) असे आहे.
गुरुवारी सकाळी मोहन पोवार यांनी रिक्षा घरासमोर उभी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला चहा-पान, चर्चा… आणि नंतर वादाची ठिणगी पेटली. पोवार यांनी आईवरून शिवी दिल्यामुळे रागाने पेटलेल्या शेळके यांनी जवळच पडलेल्या चाकूने पोवार यांचा गळा चिरला. जागीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितावर लक्ष केंद्रीत केले गेले आणि तातडीने अटक करण्यात आली.
👉 या धक्कादायक घटनेने कोल्हापूरात एकच खळबळ उडाली आहे.
👉 किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची ही घटना शहरासाठी धोक्याची घंटा आहे.
रिपोर्टर – श्रीकांत पाटील