गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे फेस्टिवलमध्ये नारदीय कीर्तनाचा जलवा

पुणे फेस्टिवलमध्ये नारदीय कीर्तनाचा जलवा

विस्मृतीच्या पडद्याआड गेलेली नारदीय कीर्तन कला पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर पुन्हा रंगून गेली. आणि सगळ्यात खास म्हणजे, यावेळी ही परंपरा महिला कीर्तनकारांनी रंगवली.

‘१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती’ या विषयावर आधारित कीर्तन सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. निवेदिता मेहंदळे, निर्मला जगताप, प्रज्ञा वाळिंबे, तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी, धनदा गदगकर, दया कुलकर्णी, वैदेही जोशी आणि अर्चना कुबेर यांनी एकापेक्षा एक सुंदर निरूपण करत नारदीय परंपरेला नवा उन्मेश दिला.

महोत्सवाचे संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी या सर्व कलाकारांचा सत्कार करताना “पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला नवा साज चढविण्याचे काम महिला कीर्तनकारांनी केले आहे,” असे सांगितले.

🔥 प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली. विस्मृतीत गेलेली कला पुन्हा लोकांच्या मनात जागा करून गेल्याने, हा उपक्रम ‘सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची सुरुवात’ ठरला, अशी चर्चा रंगली.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version