कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने एकत्र येऊन सत्तांतर घडवले आहे.त्यामुळे भाजपचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे बजरंग पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. बजरंग पाटील यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या या विजयामुळे भाजपचे नेते माजी मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह महाडिक गट पूर्णपणे कोलमडून गेल्याचे चित्र आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांसह बेळगाव येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हजिल्हा परिषद निवडणुकीसाठी अध्यक्ष पदी काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली.
यासाठी शिवसेनेला महत्त्वाची सभापतीपद ही देण्याचे निश्चित झाले. बहुमताचा आकडा ४१ हून अधिक जात असल्याने महाविकास आघाडीच्या विजयाच्या शिक्कामोर्तबावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.