कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना होत आला आहे तरी सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता आहे. तर दुसरीकडे महापौर पदासाठी राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत काही ठिकाणी महापौर पदे जाहीरही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल कोल्हापूर मध्ये महापौर पदाची निवड करण्यात आली.
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या एडवोकेट सूरमंजिरी लाटकर यांची ४३ विरुद्ध ३२ मतांनी निवड झाली. त्यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संजय मोहिते आणि भाजप ताराराणी आघाडीचे कमलकर भोपळे यांच्यात लढत झाली. या लढतीतही संजय मोहिते यांनी कमलकर भोपळे यांना ४३ विरुद्ध ३२ मतांनी पराभव केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त डॉक्टर एम एस कलशेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.