कोल्हापूर, ४ सप्टेंबर २०२३ : जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. परिणामी ठिकठिकाणी जाळपोळ, आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. काही ठिकाणची सार्वजनिक प्रवासी सेवा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात काही नागरिकांसह पोलीसही जखमी झाले होते. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. ठिकठिकाणी जाळपोळ, गाड्यांची तोडफोड केली जात आहे. खबरदारी म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाकडून सार्वजनिक प्रवास सेवा स्थगित करण्यात आली आहे.
पुण्याहून जालना, संभाजीनगर, नांदेडला जाणारी बससेवा ठप्प झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही काही ठिकाणची बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणून खाजगी बससेवांचा मार्ग म्हणून खाजगी बससेवांचा मार्ग निवडावा लागत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर