हिमालयातील हनुमान तिब्बा शिखर कोल्हापूरच्या एसटी कंडक्टरने केले सर

कोल्हापूर, १९ जुलै २०२३: कोल्हापूरातील एसटी कंडक्टर अमोल आळवेकर व त्यांच्या तीन साथीदारांनी हिमालयातील हनुमान तिब्बा शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे. हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पंजाल रांगेच्या मध्यवस्तीत असलेले सर्वांत उंच आणि अवघड समजले जाणारे माऊंट हनुमान तिब्बा (५९८२ मीटर) शिखर त्यांनी सर केले आहे.

अवघड शिखर सर करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील गिर्यारोहक अमोल आळवेकर हे पहिले व्यक्ती ठरले आहेत. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील पहिले कर्मचारी ठरले. त्यांनी हिमालयातील बेसिक अॅडव्हान्स एम.ओ.आय हे गिर्यारोहणातील कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत. बी. कॉम झालेले आळवेकर अॅथलेटिक्समध्ये एफएसटीओ म्हणून काम करत आहेत.

गेली वीस वर्ष एसटी महामंडळाची नोकरी सांभाळून गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू आणि प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी हिमालयातील या अगोदर १७,३५३ फूट उंचीचे फ्रेंडशिप शिखर सर केले आहे. क्षितिदार येथे १५,७०० फुटांवर हाईट गेमिंग व देव तेबा शिखरावर १७,६०० फुटांपर्यंत चढाई केली आहे. या मोहिमेसाठी त्यांना गिरीमित्र प्रतिष्ठान आणि प्रफुल मांगोरे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा