अबुधाबी, २५ ऑक्टोबर २०२०: कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी १९५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १३५ धावाच करता आल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर ऋषभ पंतने २७ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही फंलदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने ३ विकेट्स घेतल्या. तसेच लॉकी फॅर्ग्युसनने १ विकेट घेतला.
विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची खराब सुरुवात राहिली. पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे आऊट झाला. त्यानंतर दिल्लीचा १३ स्कोअर असताना शिखर धवन बाद झाला. यानंतर तिसऱ्या विकेटसाठी ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर ऋषभ पंत २७ धावांवर बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर दिल्लीने ९५ धावांवर पाठोपाठ २ विकेट्स गमावल्या. शिमरॉन हेटमायर १० तर कर्णधार लोकेश राहुल ४७ धावांवर आऊट झाला. यानंतर दिल्लीने विकेट गमावल्या. यानंतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही.
त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १९४ धावा केल्या. कोलकाताकडून नितीश राणाने ८१ तर सुनील नारायणने ६४ धावांची धमाकेदार खेळी केली. दिल्लीकडून एनरिच नोर्तजे, कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिस या तिकडीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताची फार चांगली सुरुवात राहिली नाही. कोलकाताने आपल्या पहिल्या ३ विकेट्स ठराविक अंतराने गमावल्या. कोलकाताने ११ धावांवर पहिली, ३५ धावांवर दुसरी आणि ४२ धावांवर तिसरी विकेट गमावली. शुभमन गिलने ९, राहुल त्रिपाठीने १३ तर दिनेश कार्तिकने ३ धावा केल्या.
कोलकाताची ७.२ ओव्हरमध्ये ४२-३ अशी अवस्था झाली. यानंतर सुनील नारायण आणि नितीश राणा या दोघांनी कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची धमाकेदार पार्टनरशीप केली. यादरम्यान या दोन्ही खेळाडूंनी आपले अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी तोडायला रबाडाला यश आले. त्याने सुनील नारायणला बाद केले. नारायणने ३२ चेंडूत ६४ धावा केल्या. याखेळीत त्याने ४ सिक्स आणि ६ फोर लगावले.
यानंतर मोर्गन मैदानात आला. नितीश राणाने यानंतर फटकेबाजी केली. मात्र तोही आऊट झाला. राणाला मार्कस स्टोयनिसने बाद केले. नितीशने ५३ चेंडूत ८१ धावा केल्या. यामध्ये त्याने १३ फोर मारले तर १ सिक्सही लगावला. कर्णधार इयोन मॉर्गनने १७ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे