DC vs KKR, 29 एप्रिल 2022: गुरुवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये, दिल्ली कॅपिटल्सने (DC) कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 4 गडी राखून पराभव केला. ऋषभ पंतच्या संघाने 6 चेंडू बाकी असताना 147 धावांचे लक्ष्य गाठले. आयपीएलच्या चालू मोसमातील कोलकाताचा हा सलग पाचवा पराभव आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा डाव (150/6)
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातही अत्यंत खराब झाली आणि त्यांनी 17 धावांपर्यंत पृथ्वी शॉ (0 धावा) आणि मिचेल मार्श यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर ललित यादव आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 65 धावांची भागीदारी करत डावाची धुरा सांभाळली. वॉर्नरने 42 आणि ललित यादवने 22 धावांचे योगदान दिले.
वॉर्नर बाद झाल्यानंतर ललित आणि कर्णधार पंतही पॅव्हेलियनमध्ये परतले आणि दिल्लीची 5 बाद 84 अशी अवस्था झाली. यानंतर रोव्हमन पॉवेल आणि अक्षर पटेल यांनी शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पॉवेलने नाबाद 33 आणि अक्षर पटेलने 24 धावा केल्या. केकेआरकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले.
पहिली विकेट – पृथ्वी शॉ 0 धावा, (0/1)
दुसरी विकेट- मिचेल मार्श १३ धावा (17/2)
तिसरी विकेट- डेव्हिड वॉर्नर 42 धावा (82/3)
चौथी विकेट- ललित यादव 22 धावा (84/4)
पाचवी विकेट – ऋषभ पंत 2 धावा, (84/5)
सहावी विकेट- अक्षर पटेल 24 धावा (113/6)
कोलकाता नाइट रायडर्सचा डाव (146/5)
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना कोलकाताची सुरुवात खराब झाली आणि 35 धावांवर चार विकेट गमावल्या. यानंतर नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी 48 धावांची भर घालून डाव सांभाळला. श्रेयसने चार चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. श्रेयस बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल एकही धाव न काढता बाद झाला.
अशा स्थितीत अखेरच्या षटकात राणाने शानदार खेळ दाखवत संघाला दीडशेच्या जवळ पोहोचवले. नितीश राणाने 34 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. यादरम्यान राणाने रिंकू सिंगसोबत 62 धावांची शानदार भागीदारी केली. दिल्लीकडून कुलदीप यादवने चार तर मुस्तफिझूर रहमानने तीन खेळाडूंना बाद केले.
पहिली विकेट – आरोन फिंच 3 धावा, (4/1)
दुसरी विकेट- व्यंकटेश अय्यर 6 धावा (22/2)
तिसरी विकेट – बाबा इंद्रजीत 6 धावा (35/3)
चौथी विकेट – सुनील नरेन 0 धावा (35/4)
पाचवी विकेट – श्रेयस अय्यर 42 धावा (83/5)
6वी विकेट – आंद्रे रसेल 0 धावा, (83/6)
सातवी विकेट- रिंकू सिंग 23 धावा (145/7)
आठवी विकेट- नितीश राणा 57 धावा (146/8)
नववा विकेट – टिम साऊदी, 0 धावा (146/9)
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रोवमन पॉवेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग-११: आरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे