कोणाच्या नावे आहे सर्वात जास्त बजेट जाहीर करण्याचा विक्रम

14

नवी दिल्ली: अर्थसंकल्प मांडणार्‍या अर्थमंत्र्यांची नजर संपूर्ण देशावर असते. अर्थसंकल्प सादर करण्याबरोबरच अनेक अर्थमंत्री एक विक्रमही करतात. असाच एक विक्रम गुजरातमधील कॉंग्रेस नेते आणि नंतर बिगर-कॉंग्रेस सरकारचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केला होता.

आतापर्यंत देशातील सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम गुजरातमधील कॉंग्रेस नेते मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. भारताचे चौथे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून १० अर्थसंकल्प सादर केले. त्यांच्या नंतर सर्वात जास्त अर्थसंकल्प जाहीर करणारे मंत्री हे पी. चिदंबरम आहेत. पी. चिदंबरम यांनी आतापर्यंत आठ वेळा संसदेमध्ये बजेट जाहीर केले आहे. चिदंबरम यांनाही मोरारजी देसाई यांचे रेकॉर्ड मोडता आले नाही.

विशेष म्हणजे यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत असून दुसर्‍या दिवशी १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या सलग दुसरे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा