दिग्दर्शकाच्या नजरेतून कोंकणी चित्रपट ‘काजरो’

द गोवन स्टुडिओ निर्मित कोंकणी चित्रपट काजरो (The bitter tree) यंदा अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये गाजतोय. भारत सरकारच्या गोवा फिल्म फेस्टिवल, मुंबईतील मामी फेस्टिवल, बंगलोर फिल्म फेस्टिवल, औरंगाबाद फेस्टिवल अशा अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये काजरो हा चित्रपट तुफान गाजतोय.
१  तास ५५ मिनिट एवढा अवधी असलेली ही अनकट फिल्म आहे. ही या चित्रपटाची खासियत आहे. एक वेगळा प्रयोग आहे. राजेश पेडणेकर हे या चित्रपटाचे निर्माते असून नितीन भास्कर हे दिग्दर्शक आहेत.
या चित्रपटातील मुख्य कलाकार विठ्ठल काळे यांना औरंगाबाद फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा