मुंबई : फाटलेली नोट बदलायची असल्यास आता कोणत्याही बँकमध्ये बदलून दिली जाणार आहे. बँक कर्मचारी नोट बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही.
RBIच्या नियमांनुसार, ज्या बँक फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नकार देतील त्यांची तक्रार बँकिंग लोकपाल किंवा RBIच्या तक्रार पोर्टलवर करता येऊ शकते.
भारतीय रिझर्व्ह बँकने सर्व बँकांना अशा प्रकारच्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले आहेत.
सोबतच सर्व बँकांमध्ये या सुविधेबाबत नोटीस लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नोटेच्या फाटलेल्या भागाच्या आधारे त्याचं रिफंड दिलं जातं.
५०रूपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या नोटा बदलायच्या असल्यास आणि नोटेचा ८० टक्के भाग चांगला असल्यास बँक पूर्ण रिफंड देते. फाटलेल्या नोटेचा ४० टक्क्यांहून मोठा भाग चांगला असल्यास त्याची अर्धी किंमत मिळेल.
जर नोटेचा ४० टक्क्यांहून छोटा भाग असल्यास त्याचे रिफंड मिळणार नाही.