गोल पोस्ट गुन्हा कोपर्डी हत्याकांडाचा खटला उच्च न्यायालयाकडे

कोपर्डी हत्याकांडाचा खटला उच्च न्यायालयाकडे

अ.नगर : कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अहमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर आता फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल पुष्टी (कन्फर्मेशन) याचिकेवर सुनावणी होऊन खटला मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग झाला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती. आता मुंबई उच्च न्यायालयात या बहुप्रतिक्षित खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपींवरील फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version