साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार अशुतोष काळे

शिर्डी, 17 सप्टेंबर 2021: साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे.  शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे.  35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. याबरोबरच उपाध्यक्षपती अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. साई संस्थानचा कारभार सध्या न्यायाधीशांकडे होता. संस्थानवर स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरु होत्या.
कोण आहेत आशुतोष काळे?
35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.
विश्वस्त मंडळात कोण-कोण?
1 आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
2 अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
3 अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
4 अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
5 अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
6 सचिन रंगराव गुजर – सदस्य
7 राहुल कनाल – सदस्य
8 सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
9 जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
10 महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
11 एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12 सभापती, शिर्डी नगर पंचायत
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा