पटना, १४ सप्टेंबर २०२०: उत्तर बिहारच्या जनतेचे ९० वर्षांआधी पासूनचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. त्यांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कोसी नदीवर नवनिर्मित रेल महासेतु बनवला गेला आहे. आणि लवकरच या महासेतुवर रेल्वेची यातायात ही सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे २० सप्टेंबरआधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महासेतूचे उद्घाटन करतील असा अंदाज आहे. तसेच या कार्यक्रमाची तयारी पूर्व मध्य रेल्वे तर्फे करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार , या पुलावरून जून महिन्यात रेल्वेची चाचणी केली गेली आहे. तसेच या महासेतूवरील पुलाचा फायदा हा उत्तर बिहार मधील मागासलेल्या गावांना होणार आहे. त्यांचे ९० वर्षाचे स्वप्नं सत्यात उतरणार आहे. त्यांना यात्रा करणे खूप सोपे होणार आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर निर्मली पासून ते सरायगढ यांच्यातील अंतर जे २९८ किलोमीटर आहे. ते अवघ्या २२ किलोमीटर मध्ये पूर्ण होईल. आता सध्या तेथील लोकांना निर्मली ते सरायगड प्रवास करण्यासाठी दरभंगा – समस्तीपुर – खगडिया – मानसी – सहरासा या मार्गावरून २९८ किलोमीटर अंतर पार करून जावे लागते.
कोसी महासेतू बनवण्यासाठी चे कामकाज ६ जून २००३ पासूनच सुरु झाले होते. हा महासेतू मार्ग २ किलोमीटर इतका असेल. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यातर्फे या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तसेच या प्रकल्पासाठी एकूण ५१६ करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे