कोथंबीर चे भाव गगनाला

बाजारभाव: राज्यात जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवघ्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून घेतला आहे. अवकाळी पावसामुळे जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. पावसामुळे झालेल्या भाजीपाल्यांचे नुकसान यामुळे त्यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये कोथिंबीरीची किंमत २८० रुपये तर मुंबईमध्ये ८० रुपये एवढी वाढली आहे. पावसामुळे भुईमूग चे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेंगदाण्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला यांसारखे अनेक पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडतील यात शंका नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा