पुणे, २५ ऑगस्ट २०२३ : पुण्यातील कोयता टोळीची दहशत अजूनही संपलेली नाही. पुण्यातील हडपसर येथील म्हाडा कॉलनीत आज पुन्हा एकदा कोयता टोळीची दहशत पाहायला मिळाली. प्रत्यक्षात कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ वादातून कोयता टोळीतील आठ ते दहा जणांनी हडपसर गोसावी वस्ती परिसरात कोयत्याने तरुणावर हल्ला केला. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता टोळीचीे दहशत निर्माण होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हडपसर भागातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये किशोर आणि मिलिंद नामक मुलांमध्ये वाद झाला होता. वादानंतर टोळक्याने मिलिंदच्या राहत्या वस्तीवर जाऊन हातात चाकू घेऊन हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी तो तलवारीने दहशत निर्माण करून डोंगरात लपून बसल्याचे समोर आले होते. डोंगरात लपून बसला असतानाही पुणे पोलिसांनी त्याला शोधून अटक केली.
पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरली होती. ओंकार कुडले असे पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बॅनरवर फोटो न लावल्याने कोथरूड परिसरात तलवारीचा धाक दाखवून दहशत पसरली होती. कोयता टोळी पुण्यात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करताना दिसत आहे.
त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस या टोळीला ज्या भागात दहशत निर्माण करतात तेथे नेऊन नागरिकांसमोर रस्त्यावर उभे करताना दिसत आहेत. पुणे पोलिसांनीही शहरात शोधमोहीम सुरू केली आहे. याद्वारे अनेक गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड