क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती विशेष 

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १८८ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री अस्मितेला मातीमोल ही किंमत नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३ वर्षे वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. त्यांच्या सहवासात व संस्कारात पन्नास वर्षे राहिली. सावित्री बाईंनी वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली आणि साक्षर झाल्या. जोतिरावांच्या मनात स्त्रीशिक्षणविषक विचार प्रबळ होऊ लागला. तेव्हा स्त्रियांना कसे शिकवावे, याचा वस्तूपाठ घेण्यासाठी काही दिवस अहमदनगरला जाऊन राहिल्या आणि एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून १८५२ सालीच सरकार दरबारी त्यांचा सन्मान झाला.

सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते. त्यांनी यशवंत  नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी ज्योतीबाशी विचार्मिनय करून यशवंतलाच दत्तकच घेतले. यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष. १४ जानेवारी १८४८ साली ज्योतीबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या. पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले .

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती, म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा