इंदापूर, २४ ऑक्टोबर २०२० : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औदयोगिक कार्यानुभव या कार्यक्रमाच्या दरम्यान कोल्हापुर कृषि महाविदयालयाच्या स्नेहल राजेंद्र वचकल या कृषिकन्येने मदनवाडी परिसरातील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महात्मा फुले कृषि विदयापीठ अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषि औदयोगिक कार्यनुभव कार्यक्रमा दरम्यान डॉ.पी.एन. रसाळ, डॉ.बी.टी. कोलगणे, डॉ. एच.आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॄषि महाविदयालयाची विद्यार्थीनी स्नेहल वचकल हिने शेतकऱ्यांना माती परीक्षण कसे करावे व त्यांचे फायदे आधुनिक व शास्त्रीय पध्दतीने शेती कशी करावी तसेच पिकांवरील कीड नियंत्रण, जनावरांचा चारा पद्धती, मोबाईल ॲपचा वापर करून शेती कशी करावी या पध्दतीची माहिती यावेळी मार्गदर्शन करताना दिली.
तसेच महिलांनाही मार्गदर्शन करुन घरच्या घरी पदार्थ बनवून ते जास्त काळ कसे टिकवून ठेवतात याचेही मोलाचे मार्गदर्शन केले.
गावातील मान्यवरांनी या कृषी कन्येचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी गणपत ढवळे उपस्थित होते .
प्रतिनिधी निखिल कणसे.