कृषी विश्व (चारा पिके आणि त्यांचे प्रकार)

भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. जवळजवळ ६५ टक्के लोक खेड्यात राहतात. दैनंदिन उदरनिर्वाहासाठी त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन या व्यवसायांवर अवलंबून राहावे लागते. जगामध्ये जरी भारतात पशुधन संख्या सर्वात जास्त असली तरी जनावरांची उत्पादकता ही सर्वात कमी आहे. त्याचे मुख्य कारण हे जनावरांना मिळणारे निकृष्ट दर्जाचे खाद्य होय.

दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन व्यवसायात जवळजवळ ६० ते ६५ टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावर होतो. जनावरांच्या खाद्यामध्ये ओला चारा, सुकी वैरण आणि अंबोवन किंवा खुराक यांचा समावेश होतो. परंतु हिरव्या चाऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र हे भारतात एकूण लागवड क्षेत्राच्या ४.४ टक्के इतके अत्यल्प असल्यामुळे जवळ जवळ ६३ टक्के इतकी हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. त्याच अनुषंगाने चारा पिकांवर सविस्तर माहित देत आहेत कृषी विद्यालय, पुणे चे प्रो. सोमनाथ माने. पहा न्यूज अनकटच्या शेतकऱ्यांसाठीच्या विशेष कार्यक्रम ‘कृषी विश्व’ च्या उद्याच्या भागात फक्त www.newsuncut.tv वर संध्याकाळी ५ वाजता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा