गोल पोस्ट महाराष्ट्र विविध मागण्यांसाठी कुर्डुवाडी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

विविध मागण्यांसाठी कुर्डुवाडी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

सोलापूर, दि. ३० जुलै २०२० : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील नगर परिषद, महानगरपालिका कामगारांच्या विविध मागण्या राज्य शासनाने त्वरित मंजूर कराव्या, या मागणी करिता महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनाचा निषेध नोंदवला. कुर्डुवाडी येथे सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध नोंदवला.

राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांना कोषगार मार्फत वेतन अदा करावे, पूर्वी प्रमाणे जुनी पेन्शन द्यावी, ज्येष्ठता यादी प्रसिद्धी करून पदोन्नती द्यावी, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरक व प्रगती योजना लाभ द्यावा आदी मागण्या प्रलंबित आहेत.

या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात यासाठी  कुर्डुवाडी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाचा निषेध नोंदवत काळ्या फिती लावून दिवसभर कामे केली. मागण्या मान्य न झाल्यास ११ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version