माढा दि.२ नोव्हेंबर २०२०; माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरांमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून नागरिक या जनावरामुळे हैराण झाले आहेत.
अशातच दिवाळी सणासाठी नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. अशातच मोकाट जनावरांनी नागरिकांना नाकी नऊ आणले आहे. ज्येष्ठ नागरिक महिला व बालकांना या जनावरापासून खूप त्रास होत आहे.त्यामुळे नगर परिषदेने ध्वनीक्षेपणावरून मोकाट जनावरे दिसल्यास थेट गोशाळेत सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.असेही पालिकेने सांगितले
सोमवारी जनावरे रस्त्यावर दिसल्यास मालकावर कारवाई करून जनावरे गोशाळेत सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत या मुक्या जनावरांकडून अनेक ज्येष्ठ नागरिक व लहान मुले व महिलांवर हल्ला झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील